Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकिस्तानी सैन्याचं थेट कनेक्शन; मोठी माहिती काय?
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसाचं पाकिस्तानी सैन्याशी थेट कनेक्शन असल्याचे समजतंय.
पहलगाम हल्ल्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. मुसानं स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुसाचे पाक सेनाशी थेट संबंध आहेत आणि तो पूर्वी प्यारा कमांडो होता अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. लष्कर ए तैय्यबाने हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची देखील माहिती आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये तणावापुर वातावरण निर्माण करण्यासाठी पर्यटकांवर हल्ला करण्यात आलेला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, लष्कर ए तैय्यबाने हाशिम मुसाला प्रशिक्षण दिले आणि पहलागम येथे पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी पाठवलं. तर हाशिम मुसा आणि त्याच्या साथीदारांनी कोणाला संशय येऊ नये म्हणून लष्करी गणवेश पहलगा येथील बैसरन खोऱ्यात हल्ल्या घडवण्याच्या वेळी घातला होता, अशीही माहिती समोर येत आहे. इतकंच नाहीतर मुसाचा ISI शी थेट संबंध असून त्यांच्या सूचनेवरूनच तो लष्कर ए तैय्यबामध्ये सामील झाला होता, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली.