Video : मंत्रिमंडळात महिनाभरात मोठेफेर बदल,  गृहखात्यासह विधानसभा अध्यक्षपदात अदलाबदल होणार- सूत्र

Video : मंत्रिमंडळात महिनाभरात मोठेफेर बदल, गृहखात्यासह विधानसभा अध्यक्षपदात अदलाबदल होणार- सूत्र

| Updated on: Apr 04, 2022 | 7:14 PM

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे लोटली. या काळात महाविकास आघाडीत अनेकदा धुसफुस पाहायला मिळाली. शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी निधी वाटपावरून अनेकदा तक्रारीही केल्या. भाजपकडून अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations of corruption) करण्यात आले. तर महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) धाडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून एक […]

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे लोटली. या काळात महाविकास आघाडीत अनेकदा धुसफुस पाहायला मिळाली. शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी निधी वाटपावरून अनेकदा तक्रारीही केल्या. भाजपकडून अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations of corruption) करण्यात आले. तर महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) धाडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यात मोठे फेरबदल होणार आहेत. गृहखात्यात आणि विधानसभा अध्यक्षपदात अदलाबदल होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय.

 

 

Published on: Apr 04, 2022 07:02 PM