रामदास कदम यांना भांडी घासण्याची हौस? खोचक सवाल करत सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
'रामदास कदम यांच्यावर फार बोलून त्यांना महत्व देण्याची गरज वाटत नाही, इतरांना ईडी लावायची की नाही ते सोडून द्या, पण रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडू बाम नक्की लाववा', ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचं रामदास कदम यांना प्रत्युत्तर
अहमदनगर, १७ फेब्रुवारी २०२४ : रामदास कदम यांच्यावर फार बोलून त्यांना महत्व देण्याची गरज वाटत नाही, इतरांना ईडी लावायची की नाही ते सोडून द्या, पण रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडू बाम नक्की लाववा असं प्रत्युत्तर ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना दिले आहे. उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचारी कोण हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे असं रामदास कदम यांनी म्हटले होते… तर शिंदे गटातील 40 पैकी एकाही आमदाराने 50 खोके घेतले असं उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्याकडे जाऊन भांडी घासेन, सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी असंही शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हंटल होतं. यावर बोलताना रामदास कदम हे भांडी घासण्यावर फार लवकर येतात, प्रत्येक व्यक्तीला आपली पात्रता इतक्या लवकर कशी कळते असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.