शिवसेना अपात्रतेच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? अनिल देसाई यांनी सविस्तर सांगितलं...

शिवसेना अपात्रतेच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? अनिल देसाई यांनी सविस्तर सांगितलं…

| Updated on: Dec 19, 2023 | 7:48 PM

आज आमच्याकडे जो युक्तिवाद होता तो पूर्ण झाला आहे, असल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी म्हटलंय. 31 डिसेंबरपर्यंत अध्यक्ष निर्णय घ्यायचा होता, आता त्यांची मुदत वाढवण्यात आला. ते सत्याच्या बाजूने निर्णय देणार आहेत.

नागपूर, १९ डिसेंबर २०२३ : आज आमच्याकडे जो युक्तिवाद होता तो पूर्ण झाला आहे, असल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी म्हटलंय. 31 डिसेंबरपर्यंत अध्यक्ष निर्णय घ्यायचा होता, आता त्यांची मुदत वाढवण्यात आला. ते सत्याच्या बाजूने निर्णय देणार आहेत. त्यामुळे ऑर्डर लिहायला त्यांना वेळ लागत आहे. तर 28 ते 30 पक्षांची बैठक आज पार पडत आहे. आज सामना संपादकीय मधून एक मत मांडण्यात आले आहे की चेहरा असावा. त्याबाबत काय निर्णय होतोय हे पाहावं लागेल, असे अनिल देसाई यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी संघाने जातीनिहाय जनगणना करण्यावर भूमिका मांडली आहे त्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, जातीनिहाय जनगणना का गरजेचं आहे, हे अनेक पक्षांनी स्पष्ट केलं आहे. आत्तापर्यंत जे काही आरक्षणाचे मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्याबाबत स्पष्टता येणं गरजचे आहे. अनेक पक्षांची मागणी आहे. त्यामुळं जातनिहाय जनगणना महत्वाची असल्याचे अनिल देसाईंनी म्हटले आहे.

Published on: Dec 19, 2023 07:48 PM