भास्कर जाधव आणि नितेश राणे यांच्यात जुन्या व्हिडीओंचं वॉर, ठाकरेंच्या सभेनंतर दोघांमध्ये जुंपली
नितेश राणे यांनी राष्ट्रवादीत भास्कर जाधव असतानाचा एक व्हिडीओ समोर आणलाय तर ठाकरेंच्या समर्थकांनी नितेश राणेंचे व्हिडीओ व्हायरल केलेत. कणकवलीमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदेंसह भाजप आणि विशेष करून नारायण राणे यांना टार्गेट केलं
मुंबई, ६ फेब्रुवारी, २०२४ : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात जुन्या व्हिडीओवरून चांगलंच वॉर रंगलंय. भास्कर जाधवांनी सभेत बोलताना आव्हान दिलं होतं, त्यावर नितेश राणे यांनी राष्ट्रवादीत भास्कर जाधव असतानाचा एक व्हिडीओ समोर आणलाय तर ठाकरेंच्या समर्थकांनी नितेश राणेंचे व्हिडीओ व्हायरल केलेत. कणकवलीमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदेंसह भाजप आणि विशेष करून नारायण राणे यांना टार्गेट केलंय. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे यांचे आरोप काय होते? याचा दाखला भास्कर जाधव यांनी दिला. जुन्या भूमिकांच्या वादात ठाकरे समर्थकांनी हिंदुत्व वादाची भूमिका मांडणाऱ्या नितेश राणे यांचे व्हिडीओ व्हायरल केलेत. बघा काय आहे टिकांचा फॅशबॅक?

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
