Chandrashekhar Bawankule नॉलेज नसताना बडबड करतात, ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा घणाघात
VIDEO | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात कथित ऑडिओ क्लिपमुळे चांगलीच चर्चा रंगलीये, यावर विरोधकांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय, अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
छत्रपती संभाजीनगर, २६ सप्टेंबर २०२३ | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. कारणदेखील तसंच आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चर्चा होतेय. यामध्ये बावनकुळे हे 2024 निवडणुकीपर्यंत पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी काय करायचे याच्या सूचना ते कार्यकर्त्यांना देत असल्याचे ऐकायला मिळत आहे. यावरच ठाकरे गटाचे नेते चंद्रशेखर खैरे यांनी भाष्य केले आहे. खैरे म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे हे वाचळवीर आहेत. ते काहीही बोलतात. तुम्ही कार्यकर्त्यांना सांगतात, चहा कुणाला पाजायचा? चहा कुणाला पाजायचा हे माहिती असतं. आमदार आणि खासदार यांच्यासह पत्रकारांना कसं सांभाळायचं हे कार्यकर्त्यांना माहिती असतं, चंद्रशेखर बावनकुळे हे कधीही काहीही बोलतात, निकृष्ट दर्जाचं वक्तव्य असतं. नॉलेज नसताना बडबड करतात, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी खोचक टोला लगावला आहे.
चंद्रकांत खैरे असेही म्हणाले की, हे फुटलेले गद्दार लोक काहीही करतात, कुणी तोंडात मारतं, कुणी दारू प्या म्हणतं तर कुणीही काहीही बोलतात, त्यामुळे त्यांची प्रतिमा सुधारणार नसल्याचेही म्हणत त्यांनी सडकून टीका केली आहे.