शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतरही किशोरी पेडणकर म्हणताय, ...आम्ही जिंकून दाखवूच

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतरही किशोरी पेडणकर म्हणताय, …आम्ही जिंकून दाखवूच

| Updated on: Feb 18, 2023 | 4:36 PM

VIDEO | निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरही ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना विश्वास, म्हणताय न्याय मिळाला पण...

मुंबई : शिंदे गटाकडून कोणत्या पद्धतीने खेळी करण्यात येत आहे याची उद्धव ठाकरे यांनी आधीपासूनच कल्पना होती. त्यामुळे धक्के-पक्के काही नाही. ही कायद्याची आणि कागदावरची लढाई आहे. कायदा तर लढूच पण जी चिंगारी दिसतेय ती अधिकच भडकलेली दिसतेय, असे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणकर यांनी म्हटले आहे. मशाल या चिन्हावर समता पक्षाने दावा केल्यानंतर किशोरी पेडणकर म्हणाल्या, कागदावरच्या लढाईवर जे काही चिन्ह मिळेल त्यावर आम्ही जिंकून दाखवू. तर त्यांच्यासोबत पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी देखील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, निर्णय झालेला आहे पण न्याय मिळालेला नाही. न्याय आम्ही न्यायालयात जाऊन मागणार असल्याचे सचिन आहिर यांनी सांगितले.

Published on: Feb 18, 2023 04:34 PM