मग कुणाचा पोपट मेलाय ते जनताच दाखवेल, संजय राऊत यांची सडकून टीका
VIDEO | पुन्हा पोपटावर चर्चा, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
नांदेड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणीत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकातील दहा वाक्य वाचून दाखवली. त्यावर संजय राऊत यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, फडणवीस यांच्यावर सुद्धा काही वाक्य आहेत. ती पण त्यांनी वाचून दाखवायला पाहिजे होती. काल त्यांच्याच बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते. कोण जांभया देतंय कोण झोपतंय अशा मेलेल्या कार्यकारिणीसमोर हे आमची खिल्ली उडवतात. यावर त्यांनी पोपटावरही भाष्य केले. विधानसभा अध्यक्ष हे महात्मा आहेत. त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोपट मेलाय. आता कुणाचा पोपट उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे त्यांना कळेल. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांत जे चित्र दिसलं ती फक्त झलक आहे. १४ महापालिकांच्या निवडणुका ताबडतोब घ्या मग कळेल कुणाचा पोपट मेलाय. हे जनता दाखवेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.