एकनाथ शिंदे यांनी मुजोर अन् माजोर्डेपणा करणाऱ्यांना लगाम लावावा, कुणाचा खोचक सल्ला?
'मला कल्पना नाही भुजबळांनी राजीनामा दिला की नाही दिला हे मला माहीत नाही. पण, एक नक्की आहे बाकी काय आंदोलन व्हायचं ते होत राहील परंतु शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली ती अजिबात समर्थनीय नाही.'
वाशिम, ४ फेब्रुवारी, २०२४ : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना वापरलेल्या भाषेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला कल्पना नाही भुजबळांनी राजीनामा दिला की नाही दिला हे मला माहीत नाही. पण, एक नक्की आहे बाकी काय आंदोलन व्हायचं ते होत राहील परंतु शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली ती अजिबात समर्थनीय नाही. छगन भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांना अशी भाषा वापरणं किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल अशी भाषा वापरणं हे चुकीचं आहे. लोकप्रतिनिधी इतकी गलिच्छ भाषा वापरत असेल तर एकनाथ शिंदेंनी बेलगाम झालेल्या आणि मुजोर, माजोर्डेपणा करणाऱ्या आमदारांना लगाम घालण्याची गरज आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय. तर पुढे त्या असंही म्हणाल्या, श्रीकांत शिंदेंना खरंच उपरती होत असेल तर श्रीकांत शिंदेंनी आपल्या वडिलांना सांगावं की तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे, जर तुमच्याकडे थोडी तरी लाज शिल्लक असेल तर दोषी कोण आहे ठरवा आणि राजीनामा द्यावा.