ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना शाईफेक अन् मारहाण, नेमकं काय घडलं?
VIDEO | ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक, पोलिसात तक्रार दाखल
ठाणे : ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. तसेच पौळ यांना मारहाणही करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली आहे. या प्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. घडलेल्या या प्रकारामुळे ठाण्यातच महिला सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दरम्यान, मला कार्यक्रमाला बोलावून माझ्यावर शाईफेक करण्यात आली. मारहाण करण्यात आली. हे सर्व षडयंत्र होतं. हा षडयंत्राचा भाग होता. षडयंत्र करूनच मला इथे बोलावण्यात आलं होतं. मी सातत्याने सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू मांडत असल्याने मला टार्गेट करण्यात आलं. पण आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही. आम्ही आमचं काम करतच राहणार, असं अयोध्या पौळ यांनी म्हटलं आहे.

मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल

भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द

बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं

तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
