शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीवर अंबादास दानवे यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘मविआमध्ये…’
VIDEO | शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये होणाऱ्या संभ्रमावर केलं मोठ भाष्य
छत्रपती संभाजीनगर, १५ ऑगस्ट २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कोरेगाव पार्क येथे गुप्त बैठक झाली. या बैठकीची अद्यात राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार शरद पवार यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर संभ्रमता आहे, अनेक नेते नाराजी व्यक्त करत आहे. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही संभ्रमता नाही, परिपक्व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसतो, शरद पवार आणि मी नेहमीच भेटत असतो. आजही पाऊस पाण्याच्या गप्पा झाल्यात असे अंबादास दानवे म्हणाले. तर महाविकास आघाडी एकत्र आहे असंही अंबादास दानवे यांनी आवर्जून म्हटले.