अनिल परब आता पालकमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार? नेमका काय करणार गौप्यस्फोट?

अनिल परब आता पालकमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार? नेमका काय करणार गौप्यस्फोट?

| Updated on: Aug 10, 2023 | 5:57 PM

VIDEO | 'अनिल परब आता पालकमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार?', मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या भेटीनंतर नेमका काय दिला इशारा?

मुंबई, १० ऑगस्ट २०२३ | मुंबई महापालिका प्रकल्प, बीएमसीकडून केली जाणारी कामे, दिली जाणारी कंत्राटे, मुंबईकरांचे प्रश्न याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली. या झालेल्या बैठकीत महापालिकेत सॅनिटरी नॅपकिन मशीन खरेदी-विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनिल परब यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता, त्यावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. ‘आयुक्तांना मी हे सांगितलं. आम्ही तुम्हाला आवडो न आवडो लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे म्हणत पालकमंत्र्यांचा घोटाळा सुद्धा आम्ही लवकरच समोर मांडू, असा इशारा अनिल परब यांनी दिला.

Published on: Aug 10, 2023 05:57 PM