दादांना आता मुख्यमंत्री करा, मला तुमच्यातला दम…; भास्कर जाधव यांनी काय दिलं ओपन चॅलेंज?
भास्कर जाधव यांनी नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक आणि बेधडक शैलीत विधानसभेत भाषण करत सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला. इतकंच नाही तर भास्कर जाधव यांनी बोलत असताना भर सभागृहात भाजपला ओपन चॅलेंज दिल्याचेही पाहायला मिळाले.
नागपूर, ११ डिसेंबर २०२३ : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील आजच्या कामकाजात ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या भाषणाची अनोखी शैली पाहायला मिळाली. भास्कर जाधव यांनी नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक आणि बेधडक शैलीत विधानसभेत भाषण करत सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला. इतकंच नाही तर भास्कर जाधव यांनी बोलत असताना भर सभागृहात भाजपला ओपन चॅलेंज दिल्याचेही पाहायला मिळाले. अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करा, असं आव्हान देत अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल मी आता ठराव मांडतो. मला तुमच्यातला दम बघायचा आहे, असे आव्हान भास्कर जाधव यांनी भाजपला दिले. अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. माझ्या पक्षाच्या पाठिंब्याची हमी मी देतो, असेही भास्कर जाधव म्हणाले.