शिंदे गटात जाणार की नाही? मी मरेपर्यंत ठाकरे यांच्यासोबतच, ‘या’ नेत्यानं ठामपणे सांगत नेमका काय व्यक्त केला विश्वास?

शिंदे गटात जाणार की नाही? मी मरेपर्यंत ठाकरे यांच्यासोबतच, ‘या’ नेत्यानं ठामपणे सांगत नेमका काय व्यक्त केला विश्वास?

| Updated on: Feb 23, 2023 | 4:28 PM

VIDEO | आमचा पक्ष आणि पक्षाची निशाणा सुद्धा ठाकरे, एसीबीने बोलवूनही ‘या’ नेत्याने उद्धव ठाकरे यांना दिला विश्वास

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून चौकशी लावण्यात आल्याने ठाकरे गट अधिक आक्रमक होत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. एसीबीकडून चौकशी लावण्यात आल्यानंतरही ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी विश्वास व्यक्त केला आहे. आता ज्या प्रमाणे त्यांनी मला माहिती विचारली आहे. ती माहिती तर मी दिली आहेच मात्र पुढील आठवड्यातही मला चौकशीला बोलवलं असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रकारे ठाकरे गटाच्या नेत्यांना हा त्रास दिला जात आहे. तो चुकीचा आहे. मात्र या प्रकारचा कितीही त्रास दिला असला, कितीही चौकशी लागली तरी मी ठाकरेंसोबतच राहणार आहे असा ठामपणे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

Published on: Feb 23, 2023 04:28 PM