‘ट्रिपल इंजिनचे डब्बे घसरले तर…’, ठाकरे गटाच्या आमदाराचा शिंदे सरकारवर हल्लाबोल
VIDEO | 41 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न, ठाकरे गटाच्या आमदाराची टीका
मुंबई : 41 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडण्यात केविलवाणा प्रयत्न करत असताना असं घडण हे महाराष्ट्रासाठी लाजवणरी गोष्ट आहे, शासन आपल्या दारी हे या गावापर्यंत का नाही पोचले जो निधी देण्यात आला तो त्या लोकांपर्यंत का पोहोचला नाही? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. पुढे ते असेही म्हणाले की, आमदारांना कोट्यवधी रुपये दिले जात आहेत ते सर्वसामान्य नागरिकांचे आहेत, त्यांच्या टॅक्सचे पैसे आहेत.तर सुरेश धस हे नेहमी रागवत असतात काल ते सभागृहात रागवले , भाजपच्या आमदारांना पण चिंता वाटत आहे असाच जर निधी वाटप राहिला तर पुढे जाऊन ट्रिपल इंडिन सरकारचे डबे घसरले तर काय होणार अशी चिंता आहे , निधी वाटपावरून सत्ताधारी आमदार सुद्धा चिंताग्रस्त आहेत, असेही सचिन अहिर म्हणाले.
Published on: Jul 26, 2023 01:50 PM
Latest Videos