“वजन वाढलं म्हणून अक्कल वाढत नाही”, नारायण राणे यांचा कुणावर पलटवार
VIDEO | दीपक केसरकर आणि राणे मंत्रिपद सत्तेसाठी लाचार, ठाकरे गटातील नेत्याचा प्रहार
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही मंत्री एकाच मंचावर दिसून आल्याने शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणे आणि केसरकर हे दोघेही सत्तेसाठी लाचार असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. त्यामुळे आता कोकणातील राजकारण प्रचंड तापले आहे. दीपक केसरकर यांची लायकी काढत, त्यांना ड्रायव्हरची उपमा देत राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. तर आता मात्र सत्तेसाठी दोघंही मंत्री लाचार झाले असल्यामुळेच ते एकाच मंचावर दिसून आले असा घणाघातही वैभव नाईक यांनी त्यांच्यावर केला आहे. तर या टीकेला नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे म्हटलं आहे. वजन वाढलं म्हणून अक्कल वाढत नाही, असे राणेंनी म्हणत निशाणा साधला आहे.