राज्यात महायुती नाही तर महाझुठी सरकार – प्रियांका चतुर्वेदी
'संजय राऊत यांच्यावर चप्पल फेकण्याचं कारस्थान... 'ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी केली भाजपवर टीका, म्हणाल्या, 'राज्यात महायुती नाही तर महाझुठी सरकार...' सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रियंका चतुर्वेदी यांच्या वक्तव्याची चर्चा
‘राऊतांवर चप्पल फेकण्याचं कारस्थान भाजपच्या चेल्या चपाट्यांचं… ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी असं वक्तव्य करत भाजपवर टीका केली आहे. जेलमध्ये टाकूनही राऊत थांबले नाहीत, म्हणून हे प्रकार सुरु आहेत. भाजप आणि त्यांचे चेले चपाटे जे काही करत आहेत, त्यामुळे कळलं आहे की माहाराष्ट्राची जमना त्यांच्यासोबत नाही. संजय राऊत सतत त्यांच्याविरोधात मोठे खुलासे करत असल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, तरी देखील संजय राऊत थांबले नाहीत. संजय राऊत यांनी लढाई लढली आहे. राज्यातील ही महीयुती सरकार नाही तर, महाझुठी सरकार आहे.. भाजपचे लोकच एवढ्या खालच्या पातळीवर हे सर्व करु शकतात. असं देखील प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.
Published on: Dec 11, 2023 04:16 PM