‘श्मशान में पोहोचा देगा दोनो भाई को’, राऊत बंधूंच्या जीवाला धोका, काय दिली धमकी?
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत या दोन्ही भावांच्या जीवाला धोका
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण आज समोर आलं असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सुनील राऊत यांच्या फोनवरून ही धमकी आली होती. तसेच एका महिन्याच्या आत संजय राऊत आणि सुनील राऊत यांना स्मशनात पोहचवू, अशी धमकी या व्यक्तीने राऊत बंधूंना दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिन्याभरात गोळ्या घालून तुम्हाला स्मशानात पाठवून देऊ. संजय राऊतांना सांगा सकाळची पीसी बंद करा. आम्ही तुम्हा दोघांना जीवे मारू. आमच्या फोनवर धमकी आली. राऊत साहेब औरंगाबादला होते. ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे धमकावणाऱ्याने मला फोन केला. त्याने महिनाभरात स्मशानात पोहोचवण्याची धमकी दिली आहे, असे सुनील राऊत यांनी म्हटले आहे.