मोठी अपडेट! राऊत बंधूना आलेल्या धमकी प्रकरणात दोन आरोपींना अटक

मोठी अपडेट! राऊत बंधूना आलेल्या धमकी प्रकरणात दोन आरोपींना अटक

| Updated on: Jun 15, 2023 | 3:52 PM

सुनील राऊत यांच्या फोनवर ही धमकी आली होती. एका महिन्याच्या आत संजय राऊत आणि सुनील राऊत यांना स्मशनात पोहचवू, अशी धमकी देण्यात आली होती. तर राऊत यांना दुसऱ्यांदा अशी धमकी आल्याने एकच खळबळ माजली होती.

मुंबई : काही दिवसांपुर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सुनील राऊत यांच्या फोनवर ही धमकी आली होती. एका महिन्याच्या आत संजय राऊत आणि सुनील राऊत यांना स्मशनात पोहचवू, अशी धमकी देण्यात आली होती. तर राऊत यांना दुसऱ्यांदा अशी धमकी आल्याने एकच खळबळ माजली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट येत आहे. राऊत यांनी धमकी दिल्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कांजूरमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. तर आता त्या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे. राऊत यांना धमकी प्रकरणी अजहर मोहम्मद शेख व मयूर शिंदे आरोपींची नावे आहेत. तर यावरूनच भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी आता खळबळजनक दावा केला आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर आरोप करताना टीका देखील केली आहे. नितेश राणे यांनी, खोटं बोलणं हे राऊतांच्या रक्तातच आहे. राऊत धमकी प्रकरणात मयुर शिंदेला अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठीच शिंदे याने धमकीचा कट रचला असा आरोप राणेंनी केला आहे.

Published on: Jun 15, 2023 03:52 PM