‘… मग हे इंडियावाले काय करणार’, पंतप्रधान मोदी यांच्या ‘इंडिया’वरील टीकेवर संजय राऊत यांचं रोखठोक उत्तर
VIDEO | सामनाच्या रोखठोकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा, काय केली संजय राऊत यांनी टीका
मुंबई, 30 जुलै 2023 | ‘राजकीय विरोधकांच्या इंडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर हल्ला केलाय. इंडिया ही ईस्ट इंडिया कंपनी असल्याचे त्यांनी म्हटले. ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करायला आली आणि राज्यकर्ती बनली. आजचे राज्यकर्ते व्यापारच करत आहेत’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडियावरील टीकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून थेट उत्तर दिले आहे. ‘आज मणिपूर जळत असताना पंतप्रधान मोदी तेथे जात नाहीत की बोलायला तयार नाहीत. भाजपने ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण कोठे अनुभवले? आजच्या ‘इंडिया’ बनवण्याच्या योजनेत ते तर कोठेच नव्हते.’, असेही राऊत यांनी म्हटले.
तर ‘भारत छोड़ो’, ‘चले जाव’ आंदोलनाच्या बाबतीत पं. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची भूमिका वेगळी होती. या आंदोलनास त्यांचा पाठिंबा नव्हता व त्यांनी तसे पत्र ब्रिटिशांना म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीस लिहिले होते असे जाणकार सांगतात. त्यामुळे आपल्या विरोधकांवर ईस्ट इंडिया कंपनी असल्याचा आरोप करणे म्हणजे स्वतःवरच आरोप करण्यासारखे आहे. ‘इंडिया’ म्हणजे अतिरेकी, असे श्री. मोदी म्हणतात, पण त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील किमान पाच पक्षांत ‘इंडिया’ आहे. आल इंडिया अण्णा द्रमुक, रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (आठवले). मग हे ‘इंडिया’वाले आता काय करणार!