संजय राऊत यांचा ‘सामना’तून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, ‘केरला स्टोरीचं तुणतुणं वाजवत…’
VIDEO | केरला स्टोरीवरून सामना अग्रलेखातून संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल, काय केली टीका?
मुंबई : नुकताच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपला चांगलंच धोबीपछाड केल्याचे पाहायला मिळाले. या निकालाची, राज्यातील सत्तासंघर्षाची एकीकडे जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे द केरला स्टोरीवरही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. यावरूनच ठाकरे गटाने शिंदे फडणवीस सरकारने जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपकडून ‘केरला स्टोरी’चाही वापर केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या जडणघडणीत शाहीर साबळे यांचे योगदान आहे, परंतु ते एकनाथ शिंदे यांना ते माहिती नसेल असे भाष्य करत केरला स्टोरीचे तुणतुणे वाजवत भाजपावाले फिरत आहेत, अशी सडकून टीका ठाकरे गटाते खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केरला स्टोरी चित्रपट पाहायला असेल पण शाहिर साबळे यांच्याकडे पाठ फिरवली असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला. भाजपने, मोदी-शहांनी त्या चित्रपटाचा वापर भाजपच्या प्रचारासाठी केला. मोदींसह सगळेच झुंडी झुंडीने ‘कश्मीर फाईल्स’ पाहायला गेले. महाराष्ट्रात फडणवीस यांनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहिला की नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.