म्हणून अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्यानं केली पोलखोल

म्हणून अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्यानं केली पोलखोल

| Updated on: Feb 13, 2024 | 5:12 PM

अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेले असले तरी महाविकास आघाडीला कोणताही धक्का बसणार नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची कचोरी होणार....ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची टीका

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : तुरूंगापासून वाचण्यासाठी अशोक चव्हाण भाजपवासी झालेत. तर महाविकास आघाडीसोबत चर्चा करणारे अशोकराव आता पळून चाललेत अशी प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेले असले तरी महाविकास आघाडीला कोणताही धक्का बसणार नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची कचोरी होणार असल्याचे म्हणत खोचक टीकाही विनायक राऊत यांनी केली आहे. पुढे राऊत असेही म्हणाले की, ज्यांच्या घरातच ज्यांचे वडील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री झाले. ज्यांना दोनदा मुख्यमंत्री पद लाभलं त्यांनाच भाजपवासी व्हावं लागलं. यामागे सध्याच्या राजकारणात जी कपटनिती सुरू आहे ती दिसून येत आहे. बघा विनायक राऊत यांचा हल्लाबोल काय?

Published on: Feb 13, 2024 05:12 PM