Vinayak Raut : मनोज जरांगे पाटील यांची सभा आणि सरकारचा 'तो' डाव, विनायक राऊत यांच मोठं भाष्य काय?

Vinayak Raut : मनोज जरांगे पाटील यांची सभा आणि सरकारचा ‘तो’ डाव, विनायक राऊत यांच मोठं भाष्य काय?

| Updated on: Oct 17, 2023 | 3:16 PM

VIDEO | जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या सभेत, हिंसाचार घडवण्याचा डाव होता का? असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सरकारवर केला. तर जालन्यातील आंदोलनाला हिंसक वळण लागावं यासाठी राज्यकर्त्यांचं षढयंत्र सुरू होतं, विनायक राऊत नेमकं काय म्हणाले?

रत्नागिरी, १७ ऑक्टोबर २०२३ | जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या सभेत, हिंसाचार घडवण्याचा डाव होता का? असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेली 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबरला संपतेय. आता 24 ऑक्टोबरनंतर 5 मिनिटांचाही वेळ देणार नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी इशारा दिला. यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. जरांगे पाटील यांचे आरोप खरे आहेत, असे म्हणत राऊत म्हणाले, राज्यकर्त्यांचं षढयंत्र सुरू होतं. मनोज जरांगे सारख्या सामान्य कार्यकर्तेच्या हाकेपोटी राज्यातील साधारण 40 लाख मराठे जालन्यातील त्या 100 एकर जागेवर एकवटले होते. याच सभेला, आंदोलनाला हिंसक वळण लागावं, अशी इच्छा असणारे महाराष्ट्रातील शासनात बसले होते आणि त्यांचा तो डाव फसला. मराठ्यांनी नेहमीप्रमाणे शांतता सुव्यवस्था कायम ठेवून सभा शांततेत पार पाडली, असे विनायक राऊत म्हणाले.

Published on: Oct 17, 2023 03:16 PM