संजय राऊत यांना राष्ट्रवादी नेत्याचा थेट इशारा, म्हणाला, ‘यामुळे महाविकास आघाडीत?’
राऊत यांनी खासदार श्रिकांत शिंदे यांच्यावर प्रतिक्रिया देताना थुंकले. त्यावरून टीका होत असतानाच अजित पवार यांनी संजय राऊत यांना कानपिचक्या दिल्या. तसेच बोलताना तारतम्य बाळगा असा सल्ला दिला होता. त्यावर राऊत यांनी धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं असं म्हटलं होतं.
नागपूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात आज पुन्हा एकदा शाब्दीक चकमक उडाली. राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रतिक्रिया देताना थुंकले. त्यावरून टीका होत असतानाच अजित पवार यांनी संजय राऊत यांना कानपिचक्या दिल्या. तसेच बोलताना तारतम्य बाळगा असा सल्ला दिला होता. त्यावर राऊत यांनी धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं असं म्हटलं होतं. त्यावरून आता राजकारण चांगलं तापताना दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदगाधिकाऱ्यांत रोष दिसत आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रविण कुंटे पाटील यांनी संजय राऊत यांना सल्ला देत इशारा दिला आहे. त्यांनी राऊत यांनी बोलताना काळजी घ्यावी असे म्हटलं आहे. तर त्यांच्या चुकिच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत दरी पडू शकते असं म्हटलं आहे. त्याचबरोबर राऊत यांचा आमच्या नेत्याचा अपमान करण्याची भावना आहे का असा सवाल केला आहे. राऊत यांच्या त्या वक्तव्याचा आपण निषेध करत असल्याचं म्हटलं आहे.