‘कोंबडीचोर, औकातीत राहा’, नितेश राणे यांच्यावर कुणाचा जोरदार हल्लाबोल
VIDEO | '...तर नितेश राणे यांना शिवसैनिक फाडून खातील', कुणी दिला थेट इशारा?
सोलापूर : भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी नितेश राणे यांनी टराटरा कपडे फाडू असे म्हणत ठाकरे पिता पुत्रावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे युवा सेना नेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पिसाळलेली कुत्री आणि माणसं कपडे फाडत असतात त्यामुळे विचार करून नितेश राणे यांनी बोलावं. कपडे फाडायचा सुद्धा विचार करू नको, नाहीतर शिवसैनिक तुला फाडतील, असे एकेरी भाष्य करत शरद कोळी यांनी नितेश राणे यांना थेट इशारा दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्यावर नितेश राणे तुझ्या पोटात आग का पडली? असा सवाल शरद कोळी यांनी केला. नितेश राणे तू म्हणतो ते बरोबर आहे, की आदित्य ठाकरे सरपंच होण्याच्या योग्यतेचे नाहीत, कारण आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान होतील. मात्र नितेश राणे तू कोकणातील एकाद्या गणपती मंडळाचा सदस्य होण्याच्याही लायकीचा नाहीस, असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.