देवाच्या नावाने राजकारण करू नये, ठाकरे गटाच्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

देवाच्या नावाने राजकारण करू नये, ठाकरे गटाच्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

| Updated on: Feb 04, 2023 | 10:52 AM

अंगणेवाडीत होणारी जाहीर सभा निव्वळ राजकारण, ठाकरे गटाच्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या आंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. यावेळी अंगणेवाडीत देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, सत्तेत असताना देवेंद्र फडणवीसांनी सिंधुदुर्गात सुधारणा केली नाही, त्यामुळे आताची होणारी सभा निव्वळ राजकारण आहे. एका वेगळ्या उत्साहात भराडी देवीची यात्रा होते. या देवीच्या दर्शनाला सगळ्या पक्षाचे लोक हे भक्त म्हणून येतात, त्यामुळे अशा ठिकाणी राजकीय सभा घेऊन देवीमध्ये राजकारण आणू नये, असे त्यांनी म्हटले आहे. तर देवाला फायदा तोटा म्हणून भाजप वापर करताय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Feb 04, 2023 10:48 AM