रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांचा मोठा खुलासा

| Updated on: Apr 04, 2023 | 5:56 PM

VIDEO | ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला असून त्या गरोदर होत्या असंही सांगितले जात असताना शिवसेनेकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे

ठाणे : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी संध्याकाळी मारहाण झाली. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रशमी ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच काल नेमकं काय घडलं, हे जाणून घेतलं. तर मातृत्वासाठी उपचार सुरू असताना रोशनी शिंदे यांच्या पोटावर मारहाण केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. याप्रकरणी ठाण्याच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणी बोलताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, ‘ज्यावेळी एखाद्या महिलेला मारहाण होते त्यावेळी एमएनसी रिपोर्टच्या आधारे गुन्हा नोंद होतो. सिव्हिल सर्जन यांनी जो रिपोर्ट दिला त्यातही कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नसून ती महिला गर्भवती देखील नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी देखील रोशनी शिंदे यांना लगेच घरी जायला सांगितले पण खासदार राजन विचारे यांनी जबरदस्ती रोशनी शिंदे यांना संपदा रुग्णालयात दाखल केले त्यामुळे हा सर्व प्रकार सहानुभूती मिळवण्यासाठी रोशनी शिंदे यांनी हे ढोंग केले असल्याचे त्यांनी म्हटले.

Published on: Apr 04, 2023 05:44 PM
‘सत्य हे सत्यचं असतं! तुम्ही जर मर्द असाल तर…’, शिवसेना नेत्यानं दिलं थेट खुलं आव्हान
ठाण्यासह मुंबईत रोशनी शिंदे प्रकरण तापलं, ठाकरे गट उद्या महामोर्चा काढणार