मुंबईतील मुलुंडमध्ये रहिवासी इमारतीत अग्नितांडव, कुठं घडली घडना अन् काय झाली हानी?
VIDEO | मुंबईतील मुलुंडमध्ये अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग, काय झाली हानी? आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : मुंबईतील मुलुंडमध्ये एका रहिवासी इमारतीत भीषण अग्नितांडव झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुलूंडमधील धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु अचानक लागलेल्या या आगीमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्वरित अग्नीशमन दलास पाचारण केले. त्यानंतर काही वेळेत अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत कोणती हानी झाली का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुंबईत मुलुंडमध्ये अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुलुंड स्टेशन परिसरातील ही घटना घडल्याने परिसरात भितीचं वातावरण निर्माण झाले आहे.