पुणे पोलिसांची मोठी कारवाई, ‘इतक्या’ लाखांच्या ब्राऊन शुगरसह एकाला ठोकल्या बेड्या
VIDEO पुण्यात परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ, अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 40.44 लाख रुपयांच्या ब्राऊन शुगरसह एकाला अटक
पुणे : पुण्यात परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 40.44 लाख रुपयांच्या ब्राऊन शुगरसह एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शाहिद अख्तर हुसेन शेख (वय 49, रा. कोंढवा बुद्रुक येथील इनाम नगर) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून बुधवारी दुपारी शेखला त्याच्या राहत्या घराजवळील रस्त्यावरून त्याला ताब्यात घेण्यातय आले आहे. शाहिद अख्तर हुसेन शेख याला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून त्याला ज्या वेळी ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 40 लाखांचे ब्राऊन शुगर व हेरॉईनही ताब्यात घेण्यात आले.
Published on: Apr 06, 2023 09:04 PM
Latest Videos