पुणे एटीएसने आणखील दोघांच्या मुस्क्या आवळल्या; आतापर्यंत चौघांना अटक; यात एक रत्नागिरीचा
त्यावेळी त्यांच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीत ते जयपुरातील सीरियल ब्लास्ट प्रकरणातील असल्याचे उघड झाले होते. इम्रान खान आणि मोहम्मद युनिस साकी कोथरूड पोलिसांनी अटक केली. अबदुल कादीर दस्तगीर या घरमालकाला देखील आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पुणे, 29 जुलै 2023 | पुणे शहरात एटीएस पथकाने मोठी कारवाई करत (18 जुलै 2023) पुण्यातून दोन दहशतवाद्यांच्या मुस्क्या आवळल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीत ते जयपुरातील सीरियल ब्लास्ट प्रकरणातील असल्याचे उघड झाले होते. इम्रान खान आणि मोहम्मद युनिस साकी कोथरूड पोलिसांनी अटक केली. अबदुल कादीर दस्तगीर या घरमालकाला देखील आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांकडून स्फोटक पावडर, लॅपटॉप, ड्रोनचे भाग, नकाशा, इलेक्ट्रिक सर्किट, अरबीमध्ये लिहिलेल्या काही वस्तुही आढळल्या होत्या. मात्र त्यांचा तिसरा साथीदार शहानवाज आलम अजूनही फरार असून ATS कडून त्याचा शोध घेतला जात आहे. आलम याने या दोघांना लॉजिस्टिक मदत केली होती. तर आता या दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा करणाऱ्या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला रत्नागिरीहून चौकशीसाठी एटीएसने बोलावले होते. तर चौकशीनंतर दहशतवाद्यांशी त्याचा संबध असल्याचं उघड होताच त्याला अटक करण्यात आली आहे.