बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहर पोलीस ठाण्यावर रविवारी रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात सामानाची आणि फर्निचरची तोडफोड करण्यात आली आहे. मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत विश्वनाथ नगर मध्ये डी. जे. सुरू असताना पोलिसांनी मज्जाव केला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यावर हा हल्ला करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. रात्री डी.जे. वाजवण्यास मज्जाव केल्याच्या घटनेनंतर अज्ञात 8 ते 10 जणांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र पोलीस स्टेशनमधील फर्निचरसह काचांची तोडफोड करण्यात आली असून शेगावात कायदा आणि सुव्यवसतेचे तीनतेरा वाजले असल्याचे पाहायला मिळाले आहे.