Buldhana Paper News Update | आता प्रकरण SITकडे, दोषींवर कारवाई निश्चित होईल

Buldhana Paper News Update | आता प्रकरण SITकडे, दोषींवर कारवाई निश्चित होईल

| Updated on: Mar 07, 2023 | 9:13 AM

पेपर फुटी प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतल्याने आता हे प्रकरण थेट SITकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बुलढाणा : बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने राज्यात बुलढाण्याचे नाव समोर आले. त्यानंतर शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. हे प्रकरण थेट विधीमंडळात ही गेल्याने त्याची जोरदार चर्चा झाली. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतल्याने आता हे प्रकरण थेट SITकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बारावी गणित पेपरफुटीच्या प्रकरणात आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. याच्याआधी या प्रकरणी दोन अरोपिंना पकडण्यात आले असून दोन्ही आरोपी शिक्षकांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात आरोपींची संख्या सातवर गेली आहे. एसआयटीचे हे पथक मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार आहे.