Vande Bharat Express : कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आता धावणार मुंबई कोल्हापूर ‘ही’ एक्सप्रेस
कोल्हापूरकरांना फक्त महालक्ष्मी एक्स्प्रेसवरच अवलंबून राहावं लागत आहे. याचदरम्यान ता कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासही गती मिळाली आहे. ही आनंदाची बातमी आली असतानाच आता आणखीन एक मोठं गिफ्ट कोल्हापूरकरांना मिळालं आहे.
नाशिक, 13 ऑगस्ट 2023 | कोरोना काळात कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाली होती. ती अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांना फक्त महालक्ष्मी एक्स्प्रेसवरच अवलंबून राहावं लागत आहे. याचदरम्यान ता कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासही गती मिळाली आहे. ही आनंदाची बातमी आली असतानाच आता आणखीन एक मोठं गिफ्ट कोल्हापूरकरांना मिळालं आहे. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस मिळावी अशी मागणी केली होती. त्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या काही काही महिन्यात ही ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर राज्यातील पाचवी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरकरांना मिळणार असल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारकरांना आता जलद प्रवास करता येणार आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
