Raosaheb Danve on Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्याबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल-tv9

Raosaheb Danve on Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्याबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल-tv9

| Updated on: Jun 16, 2022 | 7:43 PM

पंकजा मुंडे या कुणाच्याही बोलण्यात येणाऱ्या नाही. कोणीतरी प्रस्ताव दिला आणि यांनी स्वीकारला, असं होत नाही.

औरंगाबादः भाजपमधील (BJP) एक वजनदार नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या मध्यंतरी त्यांना औरंगाबाद मध्ये काढण्यात आलेल्या जलाक्रोश मोर्चात बोलवण्यात आले नव्हते. तर त्यानंतर त्यांना विधानपरिषदेला उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यावरून त्यांचे समर्थक चांगलेच खवळले होते. त्यांनी बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाही तर भाजपनाही म्हणत आंदोलन केलं होतं. तर त्यानंतर जालन्यात ही त्या जलाक्रोश मोर्चाला नव्हता. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) प्रतिक्रीया दिली आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की, पंकजा मुंडे या कुणाच्याही बोलण्यात येणाऱ्या नाही. कोणीतरी प्रस्ताव दिला आणि यांनी स्वीकारला, असं होत नाही. पंकजा मुंडे या आता राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या आहेत. वेळ आली की योग्य तो निर्णय घेईल.

Published on: Jun 16, 2022 07:43 PM