Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; औरंगाबादवरुन पोलिसांनी घेतलं आरोपीला ताब्यात

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; औरंगाबादवरुन पोलिसांनी घेतलं आरोपीला ताब्यात

| Updated on: Aug 23, 2023 | 8:53 AM

शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना दोन महिन्यात दोन वेळा जीवे मारण्याची धमकी आली आहे. याच्याआधी त्यांनी कोल्हापूरच्या एका तरूणाने संभाजी भिडे प्रकरणात धमकी दिली होती. भुजबळांनी ब्राह्मणांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आता धमकी देण्यात आली आहे.

औरंगाबाद : 23 ऑगस्ट 2023 | राज्यात राजकीय नेत्यांना पुन्हा एकदा धमकीसत्र सुरू झाले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना देखील सत्तेत सहभागी होताच पुन्हा एकदा धमकी आली आहे. याच्याआधी जुलै महिन्यात त्यांना प्रशांत पाटील (मूळ रा. कोल्हापूर) याने धमकी दिली होती. त्यानंतर आता ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांना जिवे मारण्याचा धमकीचा फोन आला होता. त्याप्रकरणाची पोलीसांनी गंभीर दखल घेतली होती. तर याप्रकरणी नाशिक पोलिसांनी औरंगाबाद येथे कारवाई करत एकदाला एटक केली आहे. भुजबळ यांना धमकी देणाऱ्या इंद्रनील कुलकर्णीला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

Published on: Aug 23, 2023 08:53 AM