AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | वाळूज MIDC ला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाण्याची नासाडी

| Updated on: Nov 23, 2021 | 8:11 PM

पाईपलाइनमधून बाहेर पडणारे पाणी रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूकदेखील ठप्प झाली होती. शेंदूरवडा गावाजवळ ही पाइपलाइन फुटल्याची माहिती हाती आली आहे.

औरंगाबादः जायकवाडी धरणातून वाळूज एमआयडीसीला (Waluj MIDC) पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन फुटल्याने मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जायकवाडी धरणातून निघालेल्या प्रमुख लाईनमध्येच हा बिघाड झाला. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाईपलाइनमधून बाहेर पडणारे पाणी रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूकदेखील ठप्प झाली होती. शेंदूरवडा गावाजवळ ही पाइपलाइन फुटल्याची माहिती हाती आली आहे.