हवेली तालुक्यातील मोरदरवाडीमध्ये रस्ताच गायब; गावातील नागरिकांचा चिखल आणि पाण्यातून प्रवास

हवेली तालुक्यातील मोरदरवाडीमध्ये रस्ताच गायब; गावातील नागरिकांचा चिखल आणि पाण्यातून प्रवास

| Updated on: Jul 28, 2023 | 11:52 AM

मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपून टाकलं आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मोरदरवाडी गावची भीषण अवस्था झाली आहे. रामोशी वस्तीला रस्ताच नसल्यामुळे गावातील विद्यार्थी,नागरिक पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे.

पुणे,  28 जुलै 2023 | मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपून टाकलं आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मोरदरवाडी गावची भीषण अवस्था झाली आहे. रामोशी वस्तीला रस्ताच नसल्यामुळे गावातील विद्यार्थी, नागरिक पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे. या गावात 20 कुटुंब राहतात. रामोशी वस्तीसाठी स्थानिक ग्रामपंचायतने पांदण रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी महसूल विभागाकडे केली आहे. वर्ष उलटूनही अजूनही महसूल विभाग हवेली तहसील कार्यालयाकडून या बाबतीत निर्णय घेण्यात आलेला नाही.

 

Published on: Jul 28, 2023 11:52 AM