NCP Hearing | शरद पवार गटाचा 'तो' आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळला, काय सांगितलं आयोगानं बघा...

NCP Hearing | शरद पवार गटाचा ‘तो’ आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळला, काय सांगितलं आयोगानं बघा…

| Updated on: Oct 06, 2023 | 11:00 PM

VIDEO | निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावरची आजही पहिली सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. अजित पवार गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्रमृत व्यक्तींच्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश असल्याचा दावा शरद पवार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवींनी केला

नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर २०२३ | निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावरची आजही पहिली सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी असे सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने जो दावा केला तो चुकीचा आहे. अजित पवार गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र चुकीचे आणि खोटे आहेत. त्यामध्ये मृत व्यक्तींच्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश असल्याचा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. कुणीही चुकीच्या कागदपत्रांचे आधारे पक्षावर दावा करु शकत नाही. मृत पावलेल्या व्यक्तीचे कागदपत्रे आहेत, काही जण वेगळ्या पक्षाचे आहेत ते पक्षाचे आहेत, असं दाखवलं आहे. असेही मनु सिंघवी यांनी म्हटले. तर शपथपत्र बोगस असल्याचा शरद पवार गटाने केलला हा आक्षेप आयोगानं फेटाळला आहे. अजित पवार यांनी मृत व्यक्तीचं शपथपत्र जोडलं शरद पवार गटानं हा दावा केला होता. तर शपथपत्र मृत व्यक्तीचं नव्हे त्यांच्या मुलांचं असल्याचे अजित पवार गटानं म्हटलं आहे.

Published on: Oct 06, 2023 11:00 PM