सावरकर वाद; राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना खोचक सवाल; म्हणाले यावर आधी बोला
चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते, त्यामुळे योग्य त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न नक्की देण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून भाजपच्या नेत्यांना निशाना करत टीका केली होती. तसेच सरकार तुमचे आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का दिला जात नाही असा सवाल केली होता. राऊत यांच्या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं होतं. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते, त्यामुळे योग्य त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न नक्की देण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. त्यावरून पुन्हा एकदा राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेत, कधी येणार ती तुमची योग्य वेळ? असा सवाल केला आहे. भाजप सत्तेस येऊन 7 वर्ष पुर्ण झाली आहेत. तर हे आठव वर्ष आहे. पण अजूनही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न नाही. आम्ही तर पहिल्या दिवसापासून मागणी ही मागणी करतोय. पण ती पुर्ण होताना दिसत नाही. याच्या आधी केंद्रात काँग्रेस सत्तेवर होती. त्यावेळी भाजपवाले ही मागणी करायचे. पण आता तुमचेच सरकार आहे, भाजपचे सरकार आहे. तरीही सावरकर यांना भारतरत्न दिलं जात नाही त्याच्यावर तुम्ही आधी बोला असा पलटवार त्यांनी केला आहे.