शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठं संकट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता
VIDEO | महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची भीती, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी, हवामान विभागाने याबाबत दिली नवी माहिती
पुणे : गेल्या दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात अवकाळी (Unseasoanl Rain) पावसामुळे थैमान घातले असताना राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस हाहाकार माजवण्याची भीती आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनंतर राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार असल्याची चिंता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात चार विभागात पुढील चार, दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात13 ते 17 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज असून पूर्व विदर्भ ते उत्तर कर्नाटक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा मराठवाड्यातून जात असल्याने वातावरण ढगाळ बनलंय. त्यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी ,धूळे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना अलर्ट जारी असून गारांसह पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी यलो अलर्ट असून मात्र पुण्यात 13 आणि 14 ला आकाश ढगाळ राहिलं तर 17 तारखेपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.