संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून तिसऱ्या आरोपीला अटक, काय आहे नाव?

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून तिसऱ्या आरोपीला अटक, काय आहे नाव?

| Updated on: Mar 07, 2023 | 10:47 PM

VIDEO | संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात मोठी बातमी, मुंबई गुन्हे शाखेकडून तिसऱ्या आरोपीला अटक

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचे CCTV समोर आले होते. यानंतर संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी दोन जण ठाण्यातील असल्याचा निष्पन्न झाले होते. अशोक खरात आणि किसन सोळंकी अशा दोघांची नाव असून CCTV मध्ये दिसणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. CCTV मध्ये दिसणारा हाच अशोक खरात मुख्य आरोपी असून खरातवर याआधी मोक्काही लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे तर त्याच्यावर डोंबिवलीत हत्या आणि ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. यानंतर संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात मोठी बातमी समोर येत असून मुंबई गुन्हे शाखेकडून तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विकास चव्हरिया असं देशपांडे यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

Published on: Mar 07, 2023 10:47 PM