Ajit Pawar | ही राजकारण करण्याची वेळ नाही : अजित पवार

Ajit Pawar | ही राजकारण करण्याची वेळ नाही : अजित पवार

| Updated on: Jun 14, 2021 | 2:28 PM

यंत्रणा त्याच्या पातळीवर काम करत आहेत. त्यांना नाउमेद करून चालणार नाही. फरक नाही पडला तर जबाबदारी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी लागेल, असं अजित पवार म्हणाले. याचवेळी त्यांनी विरोधाकांवर टीका देखील केली.  

जिथं रुग्ण संख्या अधिक आहे तिथे जास्त लस देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ. म्युकरमायकोसिसमध्ये मृतांची आकडेवारी वाढतेय ही वस्तूस्थिती आहे. यासाठीच इंजेक्शन केंद्राच्या ताब्यात आहेत. रुग्णाच्या प्रमाणात इंजेक्शन मिळावी ही अपेक्षा आहे. कारखान्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केंद्र सरकार करतंय. 15 जूननंतर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात येतील अशी अपेक्षा आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.