Maratha Reservation : … ही नव्वळ अफवा, कुणबी प्रमाणपत्रावरून काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय. सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार ही निव्वळ अफवा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर २४ डिसेंबर रोजी बोलणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलंय
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ | राज्यात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाच्या मुद्द्याचा वाद चांगलाच तापत आहे. मंत्रिमंडळातील एकमेव मंत्री छगन भुजबळ हे ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना देण्याच्या मुद्द्याच्या विरोधात आहे. इतकंच नाही तर त्यांनी सरकारवरही निशाणा साधला. असे असताना सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार ही निव्वळ अफवा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर २४ डिसेंबर रोजी बोलणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. माध्यमांनी यावर जरांगे पाटील यांना विचारले असता त्यांनी अधिक काही न बोलता सर्व २४ तारखेला बालू असे म्हटले आहे.
Published on: Nov 09, 2023 01:48 PM
Latest Videos