आदित्य ठाकरे सरकारवर भडकले, म्हणाले 'हे सरकार जनरल डायरचं...'

आदित्य ठाकरे सरकारवर भडकले, म्हणाले ‘हे सरकार जनरल डायरचं…’

| Updated on: Sep 03, 2023 | 7:31 PM

बारसूमध्ये महिलावर लाठीचार्ज, वारकरी यांच्यावर लाठीचार्ज, खारघर येथील घटनेची अजून चौकशी नाही. मग हे सरकार काय करत आहे? सरकार नेमकं कुणाचे आहे. दुष्मनावर हल्ला करतात असा लाठीचार्ज झाला. सरकार जनरल डायरच आहे का?

मुंबई : 3 सप्टेंबर 2023 | जालना येथे लाठीचार्ज होतो आणि तो मुख्यमंत्र्यांना न कळवता होतो हे शक्यच नाही. याची जबाबदारी घेऊन खोके सरकारने राजीनामा द्यायला हवा. बारसू येथे लाठीचार्ज झाला. वारकरी यांच्यावर लाठ्या चालवल्या. असे अनेक ठिकाणी लाठीचार्ज झालेत. या सरकारला लाज वाटली पाहिजे. दुष्मनावर हल्ला करतात असा लाठीचार्ज झाला. हे सरकार जनरल डायरच आहे का? शासन आपल्या दारी लाठी काठी घेऊन का? सरकार नक्की कोणासाठी काम करतय? जनतेसाठी काम करताना सरकार दिसत नाही. वरळीमध्ये कुणी दहीहंडी घेत असेल तर ते चांगल आहे. वरळीत कार्यक्रम घेताहेत त्यांचे मी स्वागत करतो. प्रत्येक वेळी टार्गेट करतात. आता येताना एक बॅनर बघितला.  परिवर्तन होणार आहे. आता त्यांना देखील कळलं आहे की आमचे परिवर्तन होणार आहे, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.

 

Published on: Sep 03, 2023 07:31 PM