‘मविआ’त 40 जागांचं ठरलं, पण ‘या’ 8 जागांवर ठाकरे अन् काँग्रेसमध्ये अडलं
महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात मुंबईत आतापर्यंत दोनदा बैठका झाल्यात. या बैठकीत लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागांवर तोडगा निघालाय. तर ८ जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात अडलंय. कारण या ८ जागा अशा आहेत, ज्यावर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा
मुंबई, १ फेब्रुवारी २०२४ : लोकसभेच्या ४० जागांवर तिनही पक्षांचं एकमत झाल्याचे माहिती मिळतेय. मात्र ८ जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात निर्माण झालेला तिढा कायम आहे. कारण या ८ जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा असल्याचे कळतंय. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात मुंबईत आतापर्यंत दोनदा बैठका झाल्यात. या बैठकीत लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागांवर तोडगा निघालाय. तर ८ जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात अडलंय. कारण या ८ जागा अशा आहेत, ज्यावर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तुमाणे हे रामटेक, हेमंत पाटील हे हिंगोली, वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस, भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील हे खासदार आहेत. तर जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवे, शिर्डीतून शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे, मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे तर मुंबई उत्तर पश्चिम मधून गजानन किर्तीकर हे खासदार आहे. दरम्यान, मविआ आता तीन पक्षांची राहिली नाही तर यामध्ये वंचितचाही समावेश झालाय. त्यामुळे आगामी निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणा आहे.

पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर

सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?

ट्रम्प यांचा मोठा निर्णय, आयात शुल्कावरून भारताला दिला जबरदस्त झटका
