चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेरी वाघांचा दरारा; किमान 198 आणि कमाल 248 वाघांची नोंद
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर येत आहे. 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात किमान 198 आणि कमाल 248 वाघ असल्याची व्याघ्रगणनेत नोंद झाली आहे
चंद्रपूर : राज्यासह देशातील व्याघ्रप्रेमींसाठी एक आनंद वार्ता असून वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. भारतामध्ये ठिकठिकाणी 3800 पट्टेरी वाघांचा अधिवास आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील चंद्रपूरसह, बोर, नवे गाव, मेळघाट, नागझिरा, पेंच, सह्याद्री वाघ प्रकल्प, तोडोबा येथे किमान 350 ते 400 पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. त्यामुळे व्याघ्र सफारी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर येत आहे. 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात किमान 198 आणि कमाल 248 वाघ असल्याची व्याघ्रगणनेत नोंद झाली आहे. 2018 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 175 वाघांची नोंद झाली होती. तर ताडोबा व्याघ्रप्रकल्पात 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार 87 वाघांची नोंद झाली असून 2018 मध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होती 82 वाघांची नोंद झाली होती.