झाडांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणला 51 किलोचा केक, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचे असेही वृक्षप्रेम

झाडांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणला 51 किलोचा केक, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचे असेही वृक्षप्रेम

| Updated on: Aug 21, 2023 | 11:33 PM

सुधाकर चौधरी हे गेल्या काही वर्षांपासून 'झाडे लावा झाडे जगवा' ही मोहीम प्रत्यक्ष कृतीतून राबवित आहेत. यांच्या वृक्षप्रेमाने समाजसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

बुलढाणा : 21 ऑगस्ट 2023 | बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील नगर परिषदेचे कर्मचारी सुधाकर चौधरी या वृक्षप्रेमीनी एक अनोखा उपक्रम साजरा केला. चौधरी हे गेल्या काही वर्षांपासून ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही मोहीम प्रत्यक्ष कृतीतून राबवित आहेत. स्वतःच्या पगारातील ३० टक्के रक्कम त्यांनी वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपणासाठी खर्च केली आहे. आजवर हजारो झाडांचे त्यांनी रोपण करुन त्या झाडांचे संगोपण केले आहे. इतक्यावरच न थांबता त्यांनी झाडांची रोपे तयार करुन ती हजारो नागरिकांना वाटप केली. या वृक्षप्रेमीने आज तब्बल ५१ किलोंचा केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Published on: Aug 21, 2023 11:33 PM