Solapur | टॉमेटोला केवळ इतकाच प्रति किलो भाव मिळाल्यानं शेतकरी संतप्त, काय व्यक्त केली भावना?
VIDEO | सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात टॉमेटोची मोठ्या प्रमाणात आवाक झाल्याचे पाहायला मिळत आहे, मात्र टॉमेटोचे दर घसल्याने शेतकरी चिंतातूर, टॉमेटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून टॉमेटोला अवघे 4 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे .
सोलापूर, २६ सप्टेंबर २०२३ | सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात टॉमेटोची मोठ्या प्रमाणात आवाक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान टॉमेटोची आवाक मोठी झाली असली तरी टॉमेटोचे दर देखील घसरल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी टॉमेटोला 200 रूपयांपर्यंतचा भाव मिळाला होता. मात्र आता तोच भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. टॉमेटोचे भाव मोठ्याप्रमाणात घसरले असून टॉमेटोला अवघे 4 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झालेत. ‘टोमॉटोसाठी एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च केला, त्यातून किमान अडीच ते तीन लाख रुपये भाव मिळेल असे वाटले होते. मात्र माल बाजार समितीत आणल्यानंतर खिशातून प्रवास खर्च द्यावा लागतो, अशी अवस्था आहे, अशी टॉमेटो व्यापाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे सरकारने टोमॉटोला किमान 12 ते 15 रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.