सोनं, चांदी, पैसांवर डल्ला तर चोर मारतातच पण आता टोमॅटोची चोरी? नेमकं कुठ घडलं असं?
टोमॅटोच्या किमतीने १०० ते १२० रूपयांवरून थेट २०० च्या घरात मुंबईत गेले आहेत. तर आता चोरांनी त्यांचा मोर्चा टोमॅटोकडे वळवला आहे. चार एक दिवसांपुर्वीच गोंदियातून टोमॅटोची चोरी घटना समोर आली होती. तर आंध्र प्रदेशात टोमॅटो पिकांच्या राखणीसाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांची हत्या करण्यात उघडकीस आली होती.
कोल्हापूर, 29 जुलै 2023 | सध्या टोमॅटोला चांगला भाव आला आहे. त्यामुळे अनेकांच्या ताटातून आता टोमॅटोच गायब झाला आहे. तर त्याच्या महाग होण्यावर सोशल मीडियात अनेक रिल्स सध्या धुमाकूळ घालत आहेत. मात्र लाल टोमॅटोला आता सोन्याचा भाव आल्याचं दिसत आहे. कारण टोमॅटोच्या किमतीने १०० ते १२० रूपयांवरून थेट २०० च्या घरात मुंबईत गेले आहेत. तर आता चोरांनी त्यांचा मोर्चा टोमॅटोकडे वळवला आहे. चार एक दिवसांपुर्वीच गोंदियातून टोमॅटोची चोरी घटना समोर आली होती. तर आंध्र प्रदेशात टोमॅटो पिकांच्या राखणीसाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांची हत्या करण्यात उघडकीस आली होती. त्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील टोमॅटोची चोरी झाल्याचे समोर येत आहे. येथे शेतातली 50 हजारांच्या टोमॅटोंवर चोरट्यांनी डल्ला मारला आहेत. तर 50 हजार किंमतीचे गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो तोटून नेली आहेत. तर शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतात ही चोरी झाली आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही असतानाही ही चोरी करण्यात आली आहे