Pahalgam Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे फिरवली पाठ, कोण बुकिंग रद्द करतंय तर कुणी….
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली आहे. दहशतवाद्यांच्या धास्तीनं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काश्मीर पर्यटनासाठी केलेली बुकिंग देखील आता पर्यटकांनी रद्द केली आहे. त्यामुळे इथल्या पर्यटनाला आता मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाला फटका बसण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने काश्मीर सहलीसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आलं होतं. मात्र पाहिलगावमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी नियोजित सहलींचं बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. काश्मीरमधील पहलगाम, वैष्णोदेवी, सोनमर्ग, गुलमर्ग, शंकराचार्य हिल आणि चिंकारा अशा आकर्षक पर्यटन स्थळांना देश-विदेशातील पर्यटकांकडून प्रसन्नता असते. यासाठी आधीच बुकिंगही केलं जातं. मात्र पहलगाममधील हल्ल्याचा धसका आता पर्यटकांनी घेतलाय.
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पर्यटक काढता पाय घेतायत. तर ज्यांचं ठरलं होतं ते काश्मीरचं बुकिंगच रद्द करतायत. काश्मीरची बुकिंग रद्द करण्यासाठी दिवसभर फोन येत असल्याचं ट्रॅव्हल्सचे मालक सांगतायत. काश्मीरच नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूच्या परिसरात देखील नागरिक जाण्यास घाबरता आहेत. सरकारने पर्यटनाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून करण्यात येत आहे. काश्मीरचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा पर्यटन आहे. पर्यटनाच्या माध्यमातूनच काश्मीरला उत्पन्न मिळतं. त्यामुळे काश्मीरमध्ये शांतता हवी असल्याचं म्हणत हॉटेल मालकांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम

पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच

'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'

...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
